सहकार क्षेत्रातील सीकेपी बँकेवर २ मे २०१४ पासून लागू असलेले र्निबध रिझव्र्ह बँकेने आणखी तीन महिन्यांनी म्हणजे ३१ जुलै २०१६ पर्यंत वाढविले आहेत. या र्निबधांची पूर्वनिर्धारित मुदत २८ जानेवारीला संपुष्टात येणार होती. तथापि बँकेच्या खातेदारांसाठी आनंदाची बातमीही रिझव्र्ह बँकेने सुधारित दिशानिर्देशांद्वारे दिली आहे.
विशिष्ट शर्तीवर सीकेपी बँकेतील खातेदारांना खात्यातील शिलकीपैकी १०,००० रुपये काढण्याची परवानगी देणारी शिथिलता आणणारे सुधारित दिशानिर्देश रिझव्र्ह बँकेने दिले आहेत. कोणत्याही ठेवीदारे बँकेप्रति कोणत्याही प्रकारचे उत्तरदायित्व (कर्जदार किंवा तारणदार म्हणून) हे त्याचे बँकेतील ठेवींच्या बदल्यात असल्यास, ती रक्कम संबंधित कर्ज खात्यात प्रथम वळती करून घ्यावी आणि त्यानंतर ठेवीदाराच्या बचत/चालू/मुदत ठेव खाते अथवा अन्य कोणत्याही स्वरूपाच्या खात्यांच्या एकूण शिलकीपैकी फक्त १० हजार रुपये काढण्याची परवानगी देता येईल, असे सुधारित दिशानिर्देश रिझव्र्ह बँकेने १९ जानेवारीपासून लागू केले. या सुधारित दिशानिर्देशांची मुदतही ३१ जुलै २०१६ पर्यंत वाढविली गेली आहे.
तथापि आदेशातील हे परिवर्तन बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीवर रिझव्र्ह बँक समाधानी असल्याचे मानले जाऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा