चलन विनिमयात रुपयाला स्थिरता  प्रदान करण्याची रिझव्‍‌र्ह बँकेची शर्थ आणि त्याला अनेक क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मर्यादा शिथिल करण्याचा निर्णय घेऊन सरकारने दिलेली साथ तूर्तास तरी व्यर्थ ठरल्याचे गुरुवारीही सुरू राहिलेल्या रुपयाच्या घसरणीने दाखवून दिले. इतकेच नव्हे या प्रयत्नांतून रुपया सावरण्याचे सोडाच, उलट अर्थव्यवस्थेच्या वाढीला मर्यादा घालणाऱ्या झळांमुळे पतमानांकन कमी केले जाण्याची धास्ती निर्माण केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी ३३ पैशांनी कमकुवत बनला आणि त्याने ५९.६७ हा तळ गाठला. चलनात कालही ३ पैशांची घट नोंदविली गेली होती. रिझव्‍‌र्ह बँकेने लक्ष्य केलेल्या सट्टेबाजांकडून नव्हे तर गेले दोन दिवस आयातदारांकडून नियमित सुरू असलेल्या डॉलरच्या मागणीचाच रुपयावर दबाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेत अर्थउभारीच्या क्यूई३ धोरणाबाबतची अनिश्चितता अद्यापही संपलेली नाही. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भविष्यातील प्रवास अद्यापही जागतिक घडामोडींवरच अवलंबून असेल. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा दबावही स्थानिक चलनावर निर्माण होत आहे. यातून नजीकच्या काळात रुपया ५९.२० ते ६० या दरम्यान घुटमळताना दिसेल.     ’ प्रमित ब्रह्मभट्ट
मुख्याधिकारी, अल्पारी फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस

Story img Loader