नवे बँक परवाने जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने मान्यता देण्यास २४ तासांचा अवधी उलटत नाही तोच याचे पहिले लाभार्थी म्हणून रिझव्र्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील आयडीएफसी व बंधन या सूक्ष्म वित्त क्षेत्रातील दोन कंपन्यांची नावे बुधवारी उशिरा जाहीर केली. तिसऱ्या फळीतील नव्या बँका स्थापन करण्यास मध्यवर्ती बँकेकडे अर्ज करणाऱ्या २५ अर्जामध्ये या दोन वित्तसंस्था पहिल्या मानकरी ठरल्या आहेत.
नव्या बँक परवान्यांसाठी अर्जदारांच्या छाननीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने केलेल्या शिफारसीनंतर सरकारी मालकीच्या आयडीएफसी (इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट फायनान्स कंपनी) व कोलकतास्थित बंधन फायनान्शिअल सव्र्हिसेस लिमिटेडला परवाना देण्याचा निर्णय रिझव्र्ह बँकेने जारी केला आहे. बँकिंग व्यवसायासाठी रिझव्र्ह बँकेची प्राथमिक परवानगी मिळालेल्या या दोन्ही वित्तसंस्थांना आता येत्या दीड वर्षांत तयारी करावी लागेल.
रिझव्र्ह बँकेकडे आलेल्या २५ अर्जदारांपैकी सरकारी टपाल विभागाच्या अर्जाचा स्वतंत्र विचार करावा, अशी शिफारस याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. बिमल जालान समितीने केली आहे. तेव्हा आता रिझव्र्ह बँक टपाल विभागाला बँक परवाना देण्याबाबत सरकारशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. सध्याच्या निवडणूक आचारसंहितेमुळे त्याला विलंब लागण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील आणखी तीन अर्जदार प्रतीक्षेत आहेत.
बँकिंग परवाने प्रक्रियेचा प्रवास..
*फेब्रुवारी २०१० : तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांच्याकडून नव्या बँक परवान्याचे सूतोवाच.
*फेब्रुवारी २०१३ : भारतीय रिझव्र्ह बँकेकडून नव्या बँक परवान्यांसाठीची मार्गदर्शक तत्त्वे जारी.
*जुलै २०१३ : रिझव्र्ह बँकेकडे नव्या बँक परवान्यांसाठी २७ जाणांचे अर्ज प्राप्त; पैकी व्हिडीओकॉन समूहातील व्हॅल्यू इंडस्ट्रिज व टाटा सन्सची नंतर माघार.
*ऑक्टोबर २०१३ : परवाने छाननीसाठी रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती.
*फेब्रुवारी २०१४ : रिझव्र्ह बँकेकडून सर्व २५ अर्ज नजरेखालून घातल्यानंतर समितीद्वारे लाभार्थी नावांची शिफारस केलेला अहवाल सादर.
*मार्च २०१४ : परवाने जारी करण्यास अडचण येऊ नये म्हणून रिझव्र्ह बँकेकडून निवडणूक आयोगाला ना-हरकतीचे आर्जव पत्र.
*एप्रिल २०१४ : बँक व्यवसायासाठी पात्र लाभार्थीची नावे जारी करण्यास आयोगाद्वारे परवानगी व पहिल्यांदा पात्र दोन नावे जाहीर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा