देशांतर्गत सोनेखरेदी कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने मंगळवारी सोन्याची आयात करणाऱया विविध एजन्सींवर निर्बंध घातले. याआधी बॅंकांकडून होणाऱय़ा सोन्याच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले होते. तेच निर्बंध आता विविध खासगी एजन्सी, ट्रेडिंग हाऊस यांनाही लागू करण्याचा निर्णय बॅंकेने घेतला. 
१३ मे रोजी रिझर्व्ह बॅंकेने परिपत्रक काढून बॅंकांकडून होणाऱया सोन्याच्या आयातीवर निर्बंध घातले होते. त्याच निर्बंधांची व्याप्ती मंगळवारी आणखी वाढविण्यात आली. आता सोने आयात करणाऱया खासगी एजन्सी, ट्रेडिंग हाऊस यांच्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सोन्याचे दागिने निर्यात करणाऱया व्यावसायिकांसाठी सोन्याची आयात करण्याला परवानगी देण्यात येईल, असे बॅंकेन मंगळवारी काढलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.

Story img Loader