डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीने पुन्हा चिंता वाढविल्याने अमेरिकन चलनाची बँकांमार्फत विक्री करण्याच्या विचारात रिझव्र्ह बँक असल्याचे समजते. २०१४ सुरू झाले तसे भारतीय चलनाने ६२ खालचा प्रवास सुरू केला आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये ७०पर्यंत घसरणाऱ्या रुपयाला सावरण्यासाठी मध्यवर्ती बँकेने प्रामुख्याने तेल आयातदारांना लागणाऱ्या विदेशी चलनाची उपलब्धता सार्वजनिक बँकांमधून करून दिली होती. त्याला योग्य तो प्रतिसादही मिळाला. ६०पर्यंत स्थिरावलेला रुपया पुन्हा ६२च्या खाली जात आहे.
भारतीय चलनात नववर्षांतील पहिली वाढ
मुंबई : नव्या वर्षांतील पहिली रुपये तेजी परकी चलन व्यवहाराने सप्ताहअखेर नोंदविली. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन १० पैशांनी उंचावत शुक्रवारी ६२.१६ वर स्थिरावले. यामुळे रुपया आता महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे. २०१४ मधील एकाच व्यवहारातील मोठी वाढही रुपयाने राखली आहे. बँकांमार्फत डॉलर विक्रीच्या संभाव्यतेमुळे चलन भक्कम होऊ पाहत आहे. चलनाने २०१३ च्या मावळतीला ६२ च्या खालचा प्रवास करून पुन्हा धडकी भरवली.
बँकांमधून पुन्हा डॉलर विक्री?
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीने पुन्हा चिंता वाढविल्याने अमेरिकन चलनाची बँकांमार्फत विक्री करण्याच्या विचारात रिझव्र्ह बँक असल्याचे समजते.
First published on: 04-01-2014 at 08:00 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi intervenes to curb rupees intraday volatility against us dollar