रिझव्‍‌र्ह बँकेकडून घालून देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नवीन प्रकारच्या बँकांसाठी- सूक्ष्म (स्मॉल फायनान्स) बँक अथवा देयक (पेमेंट) बँक अर्ज दाखल करणाऱ्या कंपन्यांची प्रतीक्षा येत्या ऑगस्ट अखेरीस संपुष्टात येणार आहे. यापैकी एका बँकेसाठी परवाना मंजुरी मिळविण्यात यशस्वी ठरलेल्या कंपन्यांची यादी जाहीर करण्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मंगळवारी द्विमासिक पतधोरणविषयक निवेदन सादर करताना, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी किती कंपन्यांना सूक्ष्म बँक अथवा देयक बँक म्हणून परवाना मंजूर केला जाईल, याचा खुलासा मात्र केला नाही. तथापि सूक्ष्म बँकेसाठी ७२ तर देयक बँकेसाठी ४१ परवाना इच्छुक कंपन्याचे अर्ज दाखल झाले असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या विशेष कार्यक्षेत्र असणाऱ्या बँकांसाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली होती.
या नव्या प्रकारच्या बँकांसाठी महाकाय रिलायन्स इंडस्ट्रीजपासून, आदित्य बिर्ला नुव्हो आणि टेक महिंद्र या खासगी कंपन्यांनी अर्ज दाखल करून उत्सुकता दाखविली आहे. सन फार्माचे संस्थापक दिलीप सांघवी आणि फ्युचर समूहाचे संस्थापक किशोर बियाणी अशा बडय़ा उद्योगपतींनी व्यक्तिगत स्वरूपातही रिझव्‍‌र्ह बँकेकडे अर्ज केले आहेत.

या बँका काय व कशासाठी?
सूक्ष्म बँका आणि देयक बँकांना या विशेषीकृत कार्यकक्षेत काम करताना, सामान्यपणे वाणिज्य बँकांकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा प्रदान करता येणार नाहीत. देयक बँकांना कर्ज वितरणाला मंजुरी नसून केवळ ठेवी स्वीकारता येतील. या ठेवीही प्रत्येकी कमाल १ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत स्वीकारता येतील. ठेवींपैकी ७५ टक्के हिस्सा त्यांना सरकारी रोख्यांमध्ये गुंतवावा लागेल तर उर्वरित २५ टक्के ठेव निधी वाणिज्य बँकांत खाते उघडून ठेवावा लागेल. देशातील बँकिंग परिघाबाहेर राहिलेल्या व्यक्तींच्या आर्थिक समावेशकतेच्या उद्दिष्टाने मूलभूत वित्तीय सेवा प्रदान करण्यासाठी या बँकेची संकल्पना केली गेली आहे. तर सूक्ष्म वित्तीय बँकांमागची संकल्पना ही छोटे शेतकरी, सूक्ष्म व लघु-उद्योजक व अन्य असंघटित क्षेत्रातील उद्योगांना अर्थसाहाय्य देणारी संस्था या रूपात करण्यात आली आहे. या निर्धारित प्राधान्यता क्षेत्रासाठी या बँकांकडून ७५ टक्के कर्ज वितरणाचे बंधन घालण्यात आले, त्यांच्या एकूण कर्ज वितरणातील निम्मी कर्ज खाती २५ लाखांपेक्षा कमी कर्ज रकमेची असावीत, असा दंडक घालण्यात आला आहे.