भारतासह संपूर्ण आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील मध्यवर्ती बँकांनी आपल्या धोरण दरात नरमाई आणावी यासाठी घसरलेल्या महागाई दराने वाव निर्माण केला आहे, असे मत संयुक्त राष्ट्राने गुरुवारी येथे प्रसिद्ध केलेल्या अहवालाने व्यक्त केले. ‘यूएन एस्कॅप’च्या या सर्वेक्षण अहवालाने चलनफुगवटय़ाचा दर हा बहुवार्षिक नीचांकावर पोहचल्याचा आणि कारखानदारीत असमान असली तरी तुलनेने उभारी दिसून येत असल्याचा निष्कर्ष मांडला आहे. अहवालाच्या अनावरणप्रसंगी बोलताना रिझव्र्ह बँकेचे माजी डेप्युटी सुबीर गोकर्ण यांनीही देशांतर्गत सर्व घटक हे व्याजाचे दर कमी व्हावेत याकडे संकेत करणारे निश्चितच असल्याचे सांगितले. देशातील अनेक भागात झालेला बिगरमोसमी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी त्या परिणामी अन्नधान्याच्या किमती वाढल्या नसल्याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. यंदाचा पावसाळा कसा असेल, हा एक महत्त्वाचा जोखीम घटक असला, तरी पुरेसा धान्यसाठा प्रभावीपणे वापरात आणला गेला, तर तुटीच्या पावसातही अन्नधान्याच्या किमतीवर नियंत्रण राखता येऊ शकेल, असे गोकर्ण यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा