तिसऱ्या फळीतील खेळाडू बनण्यासाठी सोमवारी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले. नव्या बँक व्यवसाय परवानगी मिळण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या दफ्तरी दाखल झालेल्या अर्जाची संख्या दोन डझनांपुढे गेली आहे.सायंकाळी मुदत संपताना मध्यवर्ती बँकेकडे व्यवसाय करण्यासाठी २६ अर्ज प्राप्त झाले. चर्चेतल्या अनेक नावांसह बिगर वित्त सेवा क्षेत्रातील अनेक भिडूही या प्रक्रियेत सहभागी झाले. असे असले तरी केवळ दोन ते तीन कंपन्यांनाच यंदा परवाना मिळण्याची शक्यता आहे. यशस्वी परवानाधारकांच्या नावांवर मार्च २०१४ पर्यत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
तत्कालिन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या घोषणेनंतर रिझव्‍‌र्ह बँकेने २२ फेब्रुवारी २०१३ मध्ये याबाबत पत्रक जारी केले होते. यानुसार बँकांचे नियमन करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेकडे सोमवारी ५.४५ पर्यंत २६ कंपन्यांचे अर्ज सादर झाले. बिर्ला, टाटा, रिलायन्स (अनिल अंबानी) या खासगी उद्योग समूहासह टपाल विभाग, एलआयसी हाऊसिंग, पर्यटन वित्त महामंडळ,
उत्तरेतील स्मार्ट ग्लोबल, कोलकत्त्यातील सुर्यमणी फायनान्स, युएई एक्स्चेन्ज, व्हॅल्यू इंडस्ट्रीज,  (महाराष्ट्रातील औरंगाबादस्थित) यांनी अर्ज सादर करून तमाम अंदाज वर्तविणाऱ्यांना धक्का दिला आहे.
भांडवली बाजाराशी संबंधित अनेक ब्रोकर कंपन्या, ग्रामीण भागात सूक्ष्म वित्तसेवा पुरविणाऱ्या तसे सोने तारण करणाऱ्या कंपन्या, अनेक सार्वजनिक उपक्रम स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
चर्चेत असलेले व्हिडिओकॉन, फ्युचर समूह, सहारा इंडिया परिवार यात सहभागी झालेला नाही. महिंद्र समूहाने गेल्याच आठवडय़ात अर्ज सादर करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सार्वजनिक क्षेत्रातील पॉवर फायनान्स व रुरल इलेक्ट्रिक या कंपन्यांनीही अर्ज सादर केलेले नाहीत.
नऊ वर्षांपूवी जारी करण्यात आलेल्या नव्या खासगी बँक परवान्याच्या वेळी येस बँक आणि कोटक महिंद्र यांचा क्रमांक लागला होता. देशात सध्या एकूण २२ खासगी बँका आहेत.
* आदित्य बिर्ला निवो लिमिटेड, मुंबई
* बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेड, पुणे
* बंधन फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस प्रा.लि., कोलकत्ता
* टपाल विभाग, नवी दिल्ली
* एडेलवाईज फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस लिमिटेड, मुंबई
* आयडीएफसी लिमिटेड, मुंबई
* आयएफसीआय लिमिटेड, नवी दिल्ली
* इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, नवी दिल्ली
* इंडिया इन्फोलाईन लिमिटेड, मुंबई
* आयएनएमएसीएस मॅनेजमेन्ट सव्‍‌र्हिसेस लि., गुरगाव
* जनलक्ष्मी फायनान्शिअल सव्‍‌र्हिेसस, प्रा.लि. बंगळुरु
* जे एम फायनान्शिअल लिमिटेड, मुंबई
* एलआयसी हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन, मुंबई
* एल अ‍ॅन्ड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड, मुंबई
* मॅग्मा फिनकॉर्प लिमिटेड, कोलकत्ता
* मुथूत फायनान्स लिमिटेड, कोची
* रिलायन्स कॅपिटल लिमिटेड, मुंबई
* रेलिगेअर एन्टरप्राईजेस लिमिटेड, नवी दिल्ली
* श्रीराम कॅपिटल लिमिटेड, चेन्नई
* स्मार्ट ग्लोबल व्हेन्चर्स प्रा. लि., नोएडा
* श्रेई इन्फ्रास्ट्रक्टर फायनान्स लिमिटेड, कोलकत्ता
* सुर्यमणी फायनान्सिंग कंपनी लिमिटेड, कोलकत्ता
* टाटा सन्स लिमिटेड, मुंबई
* टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नवी दिल्ली
* युएई एक्स्चेन्ज अ‍ॅन्ड फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस लिमिटेड, कोची
*  व्हॅल्यू इंडस्ट्रीज लिमिटेड, औरंगाबाद

Story img Loader