रिझव्‍‌र्ह बँकेने महात्मा गांधी मालिकेत २० रुपये मूल्याची नवीन नोट नवीन गव्हर्नर रघुराम राजन यांच्या सहीनिशी लवकरच चलनात आणण्याचे ठरविले आहे.
महात्मा गांधी मालिका-२००५ अंतर्गत रुपयाच्या नव्या चिन्हासह चौकटीत ‘ई’ आद्याक्षर असलेली ही नोट असेल आणि नोटेच्या मागील बाजूवर छपाई वर्ष ‘२०१४’ नमूद असेल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. सध्या उपलब्ध २० रुपयांच्या नोटेसारखीच नवीन नोटेची रचना असेल. यापूर्वी चलनात असलेल्या २० रुपये मूल्याच्या नोटांचा वापरही पूर्ववत सुरू राहील, असेही तिने स्पष्ट केले आहे.

Story img Loader