रायगड जिल्ह्य़ातील सार्वजनिक क्षेत्रातील ‘आरसीएफ’च्या थळ प्रकल्पाचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. या प्रकल्पात दोन युरिया आणि एक अमोनिया निर्मिती प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. यासाठी ४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तर ‘ग्रॅन्युलेटेड सिंगल सुपर फॉस्फेट’चाही नवा प्रकल्प याच परिसरात सुरू केला जाणार आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठा खत निर्मिती प्रकल्प असणारा ‘आरसीएफ थळ प्रकल्प’ लवकरच आपली कात टाकणार आहे. प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला येत्या दोन ते तीन महिन्यांत सुरुवात होणार आहे. या नव्या प्रकल्पातून दिवसाला २,२०० मेट्रिक टन युरीया खताची निर्मिती केली जाणार आहे. तर प्रकल्पाच्या माध्यमातून ५०० ते ६०० रोजगार निर्मिती होणार आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांनाही यात प्राधान्य असणार आहे.
प्रकल्पासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाली असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लगेचच या कामाला सुरुवात होणार आहे.
थळ प्रकल्पातून सध्या दर दिवसाला जवळपास ६,००० मेट्रिक टन खत उत्पादन केल जाते. या प्रकल्पामुळे ही देशांतर्गत खतनिर्मिती प्रकल्पांची परिस्थिती चिंताजनक आहे. आरसीएफचा थळ येथील खतनिर्मिती प्रकल्प अपवाद सोडला तर तुरळक कंपन्याच सध्या नफ्यात आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. देशातील खतनिर्मितीच्या दृष्टीने हा खतनिर्मिती प्रकल्प अंत्यत महत्त्वाचा मानला जातो आहे.
‘आरसीएफ’कडून या प्रकल्प विस्ताराबरोबरच ‘ग्रॅन्युलेटेड सिंगल सुपर फॉस्फेट’चा प्रतीदिन १,७०० मेट्रिक टन क्षमतेचा खतनिर्मिती प्रकल्प आणि सल्फुरिक अॅसिडचा ७०० मेट्रिक टनचा प्रकल्पही सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पाची पर्यावरणविषयक जनसुनावणी येत्या २२ तारखेला थळ येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्रात होणार आहे.
‘आरसीएफ’ थळ प्रकल्पाचा लवकरच विस्तार
रायगड जिल्ह्य़ातील सार्वजनिक क्षेत्रातील ‘आरसीएफ’च्या थळ प्रकल्पाचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. या प्रकल्पात दोन युरिया आणि एक अमोनिया निर्मिती प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. यासाठी ४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
First published on: 19-01-2013 at 12:28 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcf thal expansion project soon