पुण्याहून एक भगिनी विचारतात की त्यांच्या दीराचे डिमॅट खाते होते हे त्यांच्या निधनानंतर आम्हाला कळले. त्या खात्यात नॉमिनी नाही. सुमारे पाच लाख रुपये किमतीचे शेअर्स डिमॅट खात्यात आहेत. पुढे काय करावे? जर त्यांची पत्नी असेल तर तिने वारसदार म्हणून योग्य त्या न्यायालयाकडून सक्सेशन सर्टििफकेट घ्यावे आणि त्याच्या आधारे डीपीकडे शेअर्सवर हक्क दाखल करावा. अर्थात त्या आधी पत्नीने स्वतच्या नावे डिमॅट खाते उघडलेले असले पाहिजे म्हणजे योग्य ती कागदपत्रे स’ाा करून दिल्यानंतर शेअर्स त्या खात्यात जमा होतील. सक्सेशन सर्टििफकेट मिळवण्याची प्रक्रिया कुणीही वकील सांगू शकतील.
अंधेरीहून सीमा देवस्थळी यांना त्यांच्याकडे असलेले बाँडचे सर्टििफकेट डिमॅट करण्यासाठी स्वीकारण्यास डीपी नकार देत आहे. याचे कारण त्या विचारतात. सीमाताई, एखादी कंपनी सीडीएसएला किंवा एनएसडीएलमध्ये नोंदणीकृत असली तरी त्या कंपनीने वितरित केलेल्या विविध सिक्युरिटीज तिने वेळोवेळी वरील दोन्ही डिपॉझिटरीत दाखल केले असतील तरच त्याचे डिमॅट करता येते. उदाहरणार्थ- एखाद्या कंपनीने १२ प्रकारचे बॉण्ड्स वितरित केले आहेत (सर्टििफकेट रूपात). मात्र त्यापकी केवळ ११ बाँड्स डिपॉझिटरीत नोंदणी केली आहे तर मग उपरोक्त बाराव्या प्रकारचे बाँड्स डिमॅट करता येणार नाहीत. यात डीपीचा काही दोष किंवा भूमिका नसते. अर्थात डीपीकडे जाण्याचे कष्ट घेण्याऐवजी सीडीएसएलच्या वेबसाइटवर जाऊन ही माहिती तुम्हाला विनामूल्य पाहता आली असती.
कल्याणहून अशोक जोशी विचारतात की माझा ब्रोकर दर महिन्याला किंवा दर तिमाहीला ट्रेिडग खात्याची पूर्तता करून देतो तर मी कोणता पर्याय निवडावा. याचा निर्णय आपणच घ्यायचा असतो. समजा तुम्ही टी+२ या दिवशी शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यात जमा करायचाही आग्रह धरू शकता. पण अनेक वेळा स्वत ग्राहक असा विचार करतो की अशा प्रकारे शेअर्स नंतर विकले तर डिमॅट खात्यात ट्रँझ्ॉक्शन चार्ज भरावा लागतो त्यापेक्षा शेअर्स ब्रोकरकडेच राहू द्यावे. कारण नंतर ते विकले तर तिथूनच परस्पर डिलिव्हरी देता येते व ट्रँझ्ॉक्शन चार्ज वाचतो. मात्र प्रत्येक तिमाहीला ट्रेिडग खात्याची पूर्तता (settlement)) केली पाहिजे असा सेबीचा आदेश आहे.
‘आयपीओ’बाबत बरेच प्रश्न सुरेश भोसले यांनी विचारले आहेत. त्याची सारांशरूपाने उत्तरे देतो. आयपीओच्या बाबतीत जर एकूण आयपीओ दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर अलॉटमेंट सक्तीने डिमॅट स्वरूपातच होणार. हळूहळू आपली वाटचाल १०० टक्के डिमॅटच्या दिशेनेच चालू राहणार आहे. दुसरा एक प्रकार म्हणजे राइट शेअर्स (हक्कभाग). या शब्दातच त्याचा अर्थ आहे. हक्काने मिळणारे शेअर्स. मात्र हे विनामूल्य न मिळता त्यासाठी कंपनी ठरवील ती रक्कम भरून ते घ्यावे लागतात. अर्थात ती रक्कम म्हणजे प्रतिशेअरचा भाव हा प्रचलित बाजारभावाहून कमीच असतो. नाहीतर ते घेणार कोण? हाही एक प्रकारचा फायदाच, जो प्रचलित शेअरधारकांना मिळतो. यासाठीही रेकॉर्ड डेट ठरवली जाते. मात्र कंपनीने देऊ केलेले हे शेअर्स घेतलेच पाहिजेत असे बंधन नसते. पण आपल्याला असा हक्क असतो की जर मला राइट शेअर्स नको असतील तर ते मी दुसऱ्या कुणालाही देऊ शकतो. याला रिनाउन्स (renounce) असे म्हणतात. अर्थात मी आधी ते शेअर्स घेऊन मग दुसऱ्याला द्यायचे असे नाही. मला कंपनीकडून जे पत्र येते (offer letter) त्यात एक स्थळप्रत असते, ज्याला रिनाउन्सेशन फॉर्म म्हणतात. त्यावर सही करून मी ज्या व्यक्तीला ते देईन ती व्यक्ती तो फॉर्म भरून सोबत चेक जोडून कंपनीकडे पाठवील. नंतर कंपनी त्याला शेअर्स देईल. तात्पर्य, मला नकोत तर मी कुणालाही देईन. हा जो माझा हक्क आहे (right)) म्हणून ते राइट शेअर्स!! कंपनी जेव्हा बोनस शेअर्स देते तेव्हा तिचे भांडवल वाढते. पर्यायाने तितके शेअर्स बाजारात अधिक येतात. मागणी आणि पुरवठा हे तत्त्व लक्षात घेता इथे पुरवठा वाढला. समजा एकास एक या प्रमाणात बोनस शेअर्स दिले असतील तर बाजारात शेअर्स दुप्पट संख्येने आले. अर्थात मागणी साधारणपणे तितकीच असते असे धरले तर भाव अर्थातच सुमारे निम्म्यावर येईल. म्हणूनच जेव्हा बोनस शेअर्स वितरित केले जातात तेव्हा ज्या गुणोत्तराने (ratio)) शेअर्स दिले जातात त्या गुणोत्तरात बाजारातील त्या शेअर्सचा भाव कमी होतो. अर्थात हे नेहमीच होईलच असेही नाही. किंवा तंतोतंत तितक्याच गुणोत्तरात भाव कमी होईल असेही नाही.
आपण जेव्हा ब्रोकरकडून शेअर्स खरेदी करतो व रेकॉर्ड डेट जवळ येत असते, तेव्हा शेअर्सचा भाव हा दोन प्रकारे सांगितला जातो. पहिला बोनससह (cum bonus) व दुसरा बोनसशिवाय (ex bonus). बोनससह म्हणजेच खरेदी केलेल्या शेअर्सवर तुम्हाला बोनस शेअर्स मिळणार व त्यासाठी तुमच्या डिमॅट खात्यात रेकॉर्ड डेटपूर्वी शेअर्स जमा होणार अशा प्रकारेच स्टॉक एक्स्चेंजने वेळापत्रक आखलेले असते. तरीदेखील समजा काही कारणाने रेकॉर्ड डेटला ते शेअर्स ब्रोकरच्या खात्यात राहिले असतील तरी नंतर ब्रोकर समजून ते शेअर्स तुम्हाला देणार हे नक्की.
कंपनी राइट शेअर्स देऊ करीत असेल तेव्हा प्रचलित शेअरधारकांना म्हणजेच डिमॅट खातेदारांना किंवा सर्टििफकेटधारकांना कंपनीकडून पत्र येते. त्यानुसार आपण राइट शेअर्ससाठी अर्ज करायचा किंवा ते कुणाला तरी द्यायचे हे आपण पाहिले. बऱ्याच मंडळींचा असा अनुभव असतो की, अर्ज करायची शेवटची तारीख जवळ येत असते, पण कंपनीकडून काही पत्रव्यवहार आलेला नसतो किंवा राइटचा फॉर्म आलेला नसतो. अशा वेळी आपण स्वतच संबंधित कंपनी किंवा तिचा आरटीए यांना पत्र लिहून तसे कळवल्यास ते डुप्लिकेट फॉर्म पाठवतात. मात्र असे पत्र पाठविताना आपला डिमॅट खाते क्रमांक किंवा आपल्याकडे सर्टििफकेट असल्यास फोलिओ क्रमांक अवश्य कळवावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा