दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या आव्हानात्मक बनलेल्या महसुली स्थितीचे प्रत्यंतर रिलायन्स कम्युनिकेशन्स या देशातील पाचव्या मोठय़ा मोबाईल सेवा कंपनीच्या बुधवारी जाहीर झालेल्या तिमाही निकालांनी दिली. सरलेल्या ऑक्टोबर-डिसेंबर २०१२ या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा तब्बल ४४ टक्क्यांनी धक्कादायकरीत्या घसरला आहे.
गेल्या दोन वर्षांच्या काही कालावधीपासून कंपनीच्या महसुली स्थितीत निरंतर घसरण सुरू आहे. परंतु आता दरवाढीच्या नव्या प्रघाताची कोंडी ‘एअरटेल’कडून फोडली गेल्यानंतर, रिलायन्सलाही दरवाढ करून आपला ताळेबंद सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू करता येतील.
या पाश्र्वभूमीवर आज शेअर बाजारात प्रमुख दूरसंचार कंपन्यांच्या समभागांना मोठी मागणी दिसून आली. एअरटेलसह, आयडिया सेल्युलर आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सचाही भाव वधारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा