रिलायन्स इंडस्ट्रीजने आफ्रिकेतील तेल विपणन व्यवसायातून संपूर्णपणे अंग काढून घेतले आहे. गल्फ आफ्रिका पेट्रोलियन कॉर्पोरेशन (गॅप्को) या भागीदारीतील कंपनीतील संपूर्ण ७६ टक्के भांडवली हिस्सा रिलायन्सने ‘टोटल एसए ऑफ फ्रान्स’ या कंपनीला विकल्याचे स्पष्ट होत आहे. गॅप्को ही आफ्रिकेतील केन्या, युगांडा आणि टांझानिया या देशातील आघाडीची तेल विपणन कंपनी असून, रिलायन्सची विदेश शाखा रिलायन्स एक्स्प्लोरेशन अँड प्रॉडक्शन डीएमसीसीचा मॉरिशसस्थित फॉच्र्युन ऑइल कॉर्पच्या बरोबरीने या कंपनीत ७६ टक्के हिस्सा होता. टोटल दोन्ही भागीदारांकडे असलेल्या भागभांडवलाची खरेदी करून गॅप्कोची १०० टक्के मालकी मिळविणार आहे, असे रिलायन्सने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. पण या सौद्यातील आर्थिक व्यवहार मात्र तिने स्पष्ट केलेला नाही.
आफ्रिकेतील तेल व्यवसायाची ‘रिलायन्स’कडून विक्री
रिलायन्स इंडस्ट्रीजने आफ्रिकेतील तेल विपणन व्यवसायातून संपूर्णपणे अंग काढून घेतले
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
First published on: 01-06-2016 at 07:44 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance exits africa oil retail business