केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरांत पाव टक्क्यांची कपात जाहीर करण्यात आली. यापूर्वी ७.७५ टक्क्यांवर असणारे रेपो दर आता ७.५० टक्क्यांवर आणण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या गृहकर्जाच्या हप्त्यांमध्ये घट होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी १५ जानेवारी रोजी आश्चर्यकारक पाव टक्क्याची रेपो दरकपात करत रिझर्व्ह बँकेने सामान्य गृहकर्जदारांना काहीसा दिलासा दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा रेपो दरांत घट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थविषयक ठोस आकडेवारीनंतर आल्यानंतरच ही कपात करण्यात येईल असे सांगितले होते. अखेर बुधवारी रेपो दर कमी करत रिझर्व्ह बँकेने सामान्यांना एकप्रकारे खुशखबरच दिली. रिझव्र्ह बँकेचे आगामी पतधोरण ९ एप्रिल रोजी सादर होणार आहे. नव्या आर्थिक वर्षांतील हे पहिले पतधोरण असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा