बँकांकडून घरांसाठीचे दिले जाणारे कर्ज हे बांधकामाच्या स्थितीशी संलग्न करून टप्प्याटप्प्याने वितरित केले जावे, असे स्पष्ट आदेश रिझव्र्ह बँकेने मंगळवारी जारी केले. बँकेने बिल्डरला एकरकमी कर्ज वितरित केल्याने घराचा ताबा नसतानाही हप्त्यांचा भरुदड सोसाव्या लागणाऱ्या गृहकर्जदारांसाठी हा दिलासाच ठरेल.
सध्याच्या ८० : २० अथवा २५ : ७५ धर्तीच्या योजना म्हणजे कर्जदार ग्राहकांसाठी आणि बँकांसाठीही जोखमीच्याच आहेत, असा निर्वाळा रिझव्र्ह बँकेने आपल्या या अधिसूचनेतून दिला आहे. म्हणूनच बांधकाम पूर्ण न झालेल्या आणि काम कोणत्या टप्प्यावर आले आहे हे पाहून त्या त्या टप्प्यानुरूप व्यक्तिगत गृहकर्ज बँकांनी द्यावे. कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण कर्ज एकरकमी वितरित केले जाऊ नये, असे तिने बँकांना आदेश दिले आहेत.
गृहकर्ज वाटपावर रिझव्र्ह बँकेचे र्निबध
बँकांकडून घरांसाठीचे दिले जाणारे कर्ज हे बांधकामाच्या स्थितीशी संलग्न करून टप्प्याटप्प्याने वितरित केले जावे, असे स्पष्ट आदेश रिझव्र्ह बँकेने मंगळवारी जारी केले.
First published on: 04-09-2013 at 12:24 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reserve bank of india put restriction on bank loan allocation