बँकांकडून घरांसाठीचे दिले जाणारे कर्ज हे बांधकामाच्या स्थितीशी संलग्न करून टप्प्याटप्प्याने वितरित केले जावे, असे स्पष्ट आदेश रिझव्र्ह बँकेने मंगळवारी जारी केले. बँकेने बिल्डरला एकरकमी कर्ज वितरित केल्याने घराचा ताबा नसतानाही हप्त्यांचा भरुदड सोसाव्या लागणाऱ्या गृहकर्जदारांसाठी हा दिलासाच ठरेल.
सध्याच्या ८० : २० अथवा २५ : ७५ धर्तीच्या योजना म्हणजे कर्जदार ग्राहकांसाठी आणि बँकांसाठीही जोखमीच्याच आहेत, असा निर्वाळा रिझव्र्ह बँकेने आपल्या या अधिसूचनेतून दिला आहे. म्हणूनच बांधकाम पूर्ण न झालेल्या आणि काम कोणत्या टप्प्यावर आले आहे हे पाहून त्या त्या टप्प्यानुरूप व्यक्तिगत गृहकर्ज बँकांनी द्यावे. कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण कर्ज एकरकमी वितरित केले जाऊ नये, असे तिने बँकांना आदेश दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in