पूर्व सागरी हद्दीतील कावेरी खोऱ्यामध्ये रिलायन्सला नवा वायुसाठा सापडला आहे. कंपनीने याबाबतची माहिती हायड्रोकार्बन महासंचालनालयाला दिली असून नव्या शोध साठय़ाला डी-५६ असे नाव देण्यात आले आहे. पूर्व सागरी किनारपट्टीपासून ६२ किमी दूर कावेरी खोऱ्यातील सीवायडी ५ या विहिरीत हा वायुसाठा कंपनीला दुसऱ्यांदा सापडला आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०११मध्ये येथे वायुसाठा सापडला होता. १,७४३ मीटर खोल पाण्याखाली साठा सापडलेल्या या विहिरीची एकूण खोली ५,७३१ मीटर आहे.
मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीज ब्रिटनच्या बीपी कंपनीबरोबर भागीदारीत वायुसाठे उत्खननाचे कार्य करते. यासाठी उभयतांमध्ये अनुक्रमे ७०:३० टक्के भागीदारी आहे. वायूची किंमत सध्या ४.२ डॉलर प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट आहे. एप्रिल २०१४ पासून ती दुप्पट करण्यात आली आहे.

रिलायन्स जिओचा सामायिक परवान्यासाठी अर्ज
ल्ल रिलायन्स जिओने ब्रॉडबॅण्डसह इतर सेवाही पुरविता येतील अशा सामायिक परवान्यासाठी दूरसंचार विभागाकडे अर्ज केला आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच काढण्यात आली होती. नव्या परवान्यासाठी कंपनीला अतिरिक्त १,६५८ कोटी रुपये भरावे लागतील. आणखी दोन ते तीन कंपन्यांनीही अशा परवान्यासाठी अर्ज केला आहे.

Story img Loader