पीटीआय, नवी दिल्ली : ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांनी २०२२ सालात केवळ लाभांशापोटी १२६.६१ कोटींचे उत्पन्न कमावले आहे. भारतातील दुसरी सर्वात मोठी माहिती-तंत्रज्ञान कंपनी असलेल्या इन्फोसिस टेक्नॉलॉजीजमध्ये अक्षता या भागधारक आहेत. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या कन्या अक्षता यांच्याकडे त्या कंपनीचे ३.८९ कोटी समभाग म्हणजेच ०.९३ टक्के हिस्सेदारी आहे. बाजारातील इन्फोसिसच्या समभागाच्या बाजारभावानुसार त्यांच्याकडे सुमारे ५,९५६ कोटी रुपयांचे समभाग आहेत. इन्फोसिसने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रति समभाग १६ रुपये लाभांश दिला आहे. तर विद्यमान २०२२-२३ आर्थिक वर्षांत कंपनीने १६.५ कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दोन्ही लाभांश मिळून प्रति समभाग ३२.५ रुपये लाभांश मिळाल्याने अक्षता यांचे एकूण उत्पन्न १२६.६१ कोटी रुपयांवर गेले आहे. वर्ष २०२१ मध्ये प्रति समभाग ३० रुपये लाभांश कंपनीने दिला होता. त्या वेळी अक्षता यांना ११९.५ कोटी रुपये लाभांशापोटी मिळाले होते. कंपनीकडून येत्या २७ ऑक्टोबरला १६.५ रुपये प्रति समभाग अंतरिम लाभांश भागधारकांना दिला जाणार आहे. मंगळवारी मुंबई शेअर बाजारात इन्फोसिसचा समभाग ०.५५ टक्के म्हणजेच ८.३५ रुपयांनी वधारून १,५२५.७५ रुपयांवर स्थिरावला.