मुंबई : एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षा रोशनी नाडर मल्होत्रा यांनी भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून सलग दुसऱ्या वर्षी स्थान कायम राखले असून, २०२१ मध्ये त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये ५४ टक्क्यांनी वाढ होऊन ती ८४,३३० कोटी रुपयांवर गेली आहे.कोटक प्रायव्हेट बँकिंग आणि हुरुन यांनी संयुक्तपणे बुधवारी प्रकाशित केलेल्या सूचीत, दशकभरापूर्वी सौंदर्य-प्रसाधनेकेंद्रित ब्रँड नायका सुरू करणाऱ्या फाल्गुनी नायर यांनी स्व-निर्मित ५७,५२० कोटी रुपयांच्या नक्त मत्तेसह पहिल्या पिढीच्या सर्वात श्रीमंत महिला उद्योजिका म्हणून यावर्षी स्थान मिळविले आहे. नायर यांच्या संपत्तीत वर्षभरात तब्बल ९६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि एकंदरीत सूचीतही त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बायोकॉनच्या किरण मुझुमदार-शॉ यांच्या संपत्तीत २१ टक्क्यांची घसरण झाली आहे आणि २९,०३० कोटी रुपयांच्या संपत्तीसह एका क्रमांकाने खाली घसरून त्या देशातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा