डॉलरच्या तुलनेत गेल्या काही सत्रांपासून घसरत जाणाऱ्या रुपयाने आता ६७ नजीकचा स्तर गाठला आहे. परकी विनिमय चलन मंचावर रुपया बुधवारी १० पैशांनी घसरत ६६.९७ पर्यंत खाली आला. स्थानिक चलनाने ६७ नजीकचा तळ हा गेल्या दोन महिन्यांनंतर गाठला आहे.
यापूर्वी रुपयाची ६७ ची पातळी ही १६ मार्च रोजी नोंदली गेली होती. चलनाचा बुधवारचा प्रवास सकाळच्या व्यवहारात ६६.९५ या किमान स्तरावरच सुरू झाला. व्यवहारात तो ६७ ला स्पर्श करताही झाला. गेल्या पाच व्यवहारातील चलनातील आपटी ही ४१ पैशांची राहिली आहे.

Story img Loader