सलग दुसऱ्या व्यवहारात ६१ च्या खालचा प्रवास नोंदविणाऱ्या रुपयाने मंगळवार अखेर मात्र तेजीचे बळ मिळविले. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन सोमवारपेक्षा ८ पैशांनी वधारत ६१.०५ पर्यंत मजबूत बनले. ०.१३ टक्क्यांच्या या वाढीने चलनाने महिन्यातील नीचांकातूनही उभारी घेतली. ४८ पैशांच्या घसरणीसह ६१.१३ वर स्थिरावताना रुपया सोमवारी महिन्यातील नीचांकावर गेला होता. स्थानिक चलनाचा मंगळवारच्या सत्रातील प्रवासही ६१ च्या खालीच होता. या वेळी तो ६१.१४ पर्यंत घसरला. मंगळवार उशिरापासून दोन दिवस चालणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर कपातीबाबतच्या बैठकीकडे परकी चलन व्यवहारकर्त्यांचे लक्ष लागले असतानाच रुपया पुन्हा भक्कम झाला आहे.

Story img Loader