रिझव्र्ह बँकेमार्फत उपाययोजना करूनही रुपयातील घसरण कायम असून ती आता देशाच्या पतमानांकनासमोर धोका निर्माण करू शकते, असे संकेत मिळू लागले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण रोखण्याकरिता मध्यवर्ती बँके सरकारी रोखे विक्रीस काढण्याची प्रक्रिया असतानाच आता गुंतवणुकीसाठी आवश्यक असे देशाचे पतमानांकन अस्थिर होऊ पाहत आहे.
फिच या अन्य पतमानांकन संस्थेने भारताचे नकारात्मक मानांकन नुकतेच स्थिर केले होते.
चलनातील अस्थिरतेसह कमकुवत अर्थव्यवस्थेपोटी देशाचा विकास दर कमी केल्याने इक्राकडूनही देशाचे पतमानांकन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पतमानांकन संस्थेने देशाचा विकास दर ०.४० टक्क्यांनी खाली आणत तो चालू आर्थिक वर्षांत ५.४ ते ५.६ टक्के असेल, असे म्हटले आहे. इक्राची प्रवर्तक कंपनी असलेल्या मूडीजने यापूर्वीच भारताचे पतमानांकन कमी होऊ शकते, असा इशारा दिला होता. मूडीजने चलन घसरण रोखण्यासाठीच्या रिझव्र्ह बँकेच्या ताज्या उपाययोजना बँकांसाठी पतपुरवठय़ाच्या दृष्टिने नकारात्मक ठरू शकतात, असे मत व्यक्त केले आहे.
अमेरिकेतील गृह विक्रीची लवकरच जाहिर होणारी आकडेवारी वाढली तर परकीय चलन अधिक भक्कम होऊन रुपयात नरमाई नोंदली जाण्याची भीती इंडिया फॉरेक्स अॅडव्हायजर्सचे संस्थापक अभिषेक गोएंका यांनी व्यक्त केली आहे.
पतमानांकन कमी होण्याची जोखीम कायम असल्याची जाणीव सिंगापूरस्थित डीबीएस या ब्रोकरेज कंपनीने करून दिली आहे. रुपयातील घसरणीबरोबरच राजकीयदृष्टय़ा निर्णय घेण्यास या देशातील सरकार कमी पडल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे.
धोका ?
रिझव्र्ह बँकेमार्फत उपाययोजना करूनही रुपयातील घसरण कायम असून ती आता देशाच्या पतमानांकनासमोर धोका निर्माण करू शकते, असे संकेत मिळू लागले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-07-2013 at 01:16 IST
Web Title: Rupee fall despite rbi government steps