अमेरिकन डॉलरपुढील भारतीय चलनाची नांगी सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिली. डॉलरच्या तुलनेत व्यवहारात ५९ च्या तळात गेलेल्या रुपयाने नवे ऐतिहासिक अवमूल्यन नोंदविले. मध्यवर्ती बँकेचा कथित हस्तक्षेप रुपयाला सावरण्यास कामी पडला असला तरी नव्या नीचांकापासून रोखण्यास हा प्रयत्न अयशस्वी ठरला. याचा विपरित धसका भांडवली बाजारावरही उमटला. एकाच सत्रात त्रिशतकी आपटी घेत सेन्सेक्स मंगळवारी दोन महिन्यांपूर्वीच्या १९ हजारावर येऊन ठेपला आहे.
कालच्या एकाच सत्रात जवळपास सव्वा रुपयाची घसरण नोंदवत ५८ च्या खाली गेलेला रुपया मंगळवारी व्यवहारात ५९ चा तळ गाठता झाला. चलनातील घसरण रोखण्यास अपेक्षित रिझव्र्ह बँकेचा पायबंद काहीसा कामी ठरला असला तरी त्याला ५८.३९ हा नवा नीचांक नोंदविण्यापासून परावृत्त करू शकला नाही.
सोमवारी १०९ पैशांची घसरण नोंदवित रुपयाला डॉलरच्या तुलनेत ५८.१६ च्या ऐतिहासिक नीचांकाला आणून ठेवणारा रुपया आज दुसऱ्या सत्रात व्यवहारात ५८.९८ पर्यंत घरंगळला होता. याचवेळी रिझव्र्ह बँकेने हस्तक्षेप केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यातील मोठी घसरण काहीशी थोपविली गेली. मात्र चलनाला त्याचा नवा नीचांक नोंदविण्यास रोखू शकली नाही. रुपयाने डॉलरच्या तुलनेत कालच्या बंदच्या तुलनेत व्यवहाराखेर २४ पैशांची आपटी खात चलनाला ५८.३९ या नव्या नीचांकाला आणून ठेवले. स्थानिक चलनाने सलग दुसऱ्या सत्रातील मोठी घसरण नोंदविली आहे. या दोन दिवसात रुपया २.५ टक्क्यांनी कमकुवत झाला. २०१३ पासून आतापर्यंत रुपया ५.५ टक्क्यांनी खालावला आहे. तर डेट पर्यायातील निधीचे रोडावणे मेपासून ४८.६ कोटी डॉलरचे झाले आहे. तर याच कालावधीत इक्विटीमधील परकी निधीचे आटणे हे ४.१६ अब्ज डॉलरचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा