डॉलरची वाढती मागणी आणि इतर प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अमेरिकेच्या चलनाची भक्कम बाजू यामुळे आज रूपयामध्ये ४८ पैशांची घसरण होत डॉलरच्या तुलनेत रूपयाने ५७.५४ रूपये अशी आजवरची सर्वात निच्चांक पातळी गाठली.
आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया आजवरच्या सर्वात निच्चांक पातळीवर घसरला आहे. उपलब्ध माहितीनुसार सकाळी ५७.३२ रुपयाचा एक डॉलर झाला आणि नंतर त्यामध्ये घसरण होऊन सर्वात निच्चांक पातळीवर म्हणजेच ५७.५४ पैसे पर्यंत पोहोचला आणि काही काळाने पुन्हा सावरत ५७.४७ वर आला. त्यामध्ये पुन्हा घसरण होत ५७.६९ वर पोहोचला. मे महिन्याच्या सुरूवातीला रुपयामध्ये ५.७१ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
अमेरीकेमध्ये नवीन आर्थिक आकडे सादर झाल्यानंतर डॉलरचा भाव वाढल्याचे दिसत आहे. याचा परिणाम केवळ भारतीय रूपयावरच नव्हे तर इतर चलनांवरही पहावयास मिळत आहे. येत्या एक दोन दिवसांमध्ये रूपयांच्या तुलनेत डॉलर आणखी मजबूत झालेला पहायला मिळेल असा तज्ञांचा अंदाज आहे.
रूपयाच्या या घसरणीचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर पडणार आहे. दोन्ही इंधनांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्येही वाढ झाल्याचे पहावयास मिळेल.
लागोपाठ पाच आठवड्यांपासून जागतिक बाजारपेठेत रूपयाची घसरण होत आहे. त्यामुळे आशियायी बाजारात सध्या रूपया इतर चलनांच्या तुलनेत सर्वात वाईत स्थितीत आहे.
बाजारात आरबीआयद्वारे सतत व्याज दर कमी करण्याचे संकेत दिले जात होते. मात्र, तसं न घडल्याने रूपयामध्ये घसरण झाल्याचे बोलले जात आहे. तसेच आरबीआय ने अद्याप रूपयांची होणारी घसरण रोखण्यासाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. निर्यातदारांकडून डॉलर खरेदी वाढली असल्याने रुपयामध्ये घसरण झाल्याचे बोलले जात आहे.
गेल्या वर्षभरात शुक्रवारी पहिल्यांदाच २२ पैशाची घसरण झाली आणि ५७ अंकाच्या जवळ जाताना ५७.०६ या पातळीवर तो येऊन पोहोचला आहे.
दरम्यान, मुंबई शेअर बाजारामध्ये सकाळच्या सत्रात १३९.९९ अंकाची वाढ होऊन १९,५२२.२२ अंकावर स्थिरावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा