डॉलरच्या तुलनेत रुपयाची तेजी सप्ताहारंभी कायम राहिली. गेल्या सलग चार सत्रात वाढ राखणारे स्थानिक चलन सोमवारअखेर ६१.१३ पर्यंत भक्कम बनले. व्यवहारात ६०.९० असा वरचा स्तर सुरुवातीलाच नोंदविणाऱ्या रुपयाने गेल्या चार महिन्यांतील उच्चांक या महिन्यात गाठला. व्यवहाराची त्याची सुरुवातच ५१ पैशांच्या वाढीने झाली होती.
दिवसअखेर २८ पैशांनी उंचावत चलन ६१.१३ असे भक्कम होताना गेल्या दोन महिन्यांच्या उच्चांकावर स्थिरावले. ३ डिसेंबर रोजी ६२.०५ अशा चढय़ा स्तराने त्याने तेजीची सुरुवात केली होती. या गेल्या चारही व्यवहारातील वाढीने त्याने एकूण १.२४ पैशांची झेप घेतली आहे. भांडवली बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा ओघ पुन्हा येऊ लागला आहे.

Story img Loader