सप्ताहारंभी १५ पैशांनी घसरत रुपया तब्बल सव्वा महिन्यांच्या तळात स्थिरावला. डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी ६२.३१ पर्यंत खाली आला. १० पैशांच्या वाढीने चलनाने गेल्या आठवडय़ाची समाप्ती केली होती. तत्पूर्वीही चलन ५० पैशांनी रोडावले होते. नव्या व्यवहाराची सुरुवात ६२.३५ अशी निराशाजनक केल्यानंतर सोमवारी सत्रात चलन ६२.४६ पर्यंत घसरले. चलनातील सोमवारच्या ०.२४ टक्के घसरणीमुळे रुपयाने ३ डिसेंबरनंतरचा तळ गाठला आहे.

Story img Loader