आठवडय़ाची सुरुवात करताना भांडवली बाजार आणि विदेशी चलन बाजार खालच्या पातळीपासून काहीसे उंचावलेले दिसले. २०१३ मधील नीचांकाला जाऊन ‘सेन्सेक्स’ दिवसअखेर ३२.९३ अंश वाढ दाखवून १९,५०१.०८ वर स्थिरावला. तर डॉलरच्या तुलनेत सत्रात ५४.४४ पर्यंत तळ गाठणारा रुपयानेही दिवसअखेर अवघ्या ४ पैशाने का होईना ५४.१८ वर येऊन महिन्याच्या तळातून डोके वर काढले. गेल्या सलगच्या दोन व्यवहारातील घसरणीमुळे मुंबई निर्देशांक १९,५०० च्याही खाली गेला होता.

Story img Loader