गेल्या १० महिन्याच्या तळातील रुपयाने शुक्रवारी ६२.५० पर्यंत पोहोचून कमालीची धडकी भरविली. दिवसअखेर डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारपेक्षा ४ पैशांनी वधारत ६२.२९ वर बंद झाला. याचबरोबर त्याची गेल्या चार व्यवहारातील सततची आपटीही थांबली.
चालू आठवडय़ात सलग चार सत्रात घसरण नोंदविणारे स्थानिक चलन ६२ च्या खाली येताना गेल्या १० महिन्यांच्या नीचांकावर आले होते.
या दरम्यान त्यात ५६ पैशांची आपटीही नोंदली गेली. सप्ताहअखेरच्या सत्रातही चलन थेट ६२.५० पर्यंत घसरताना अधिक कमकुवत बनले. त्याचा व्यवहारातील सुरुवातीचा ६२.४५ तर उच्चांकाचा टप्पा ६२.२६ असा राहिला. परकी चलन व्यवहारानंतर जाहिर होणाऱ्या नोव्हेंबरमधील किरकोळ महागाई आणि औद्योगिक उत्पादन दरावर गुंतवणूकदारांची नजर राहिली.

Story img Loader