मुंबई: भारतीय नौदलासाठी संरक्षण जहाजे तयार करण्याकरिता रिलायन्स समूह रशियाबरोबर भागीदारी करण्याच्या स्थितीत आहे. रिलायन्स-अनिल धीरुभाई अंबानी समूहाने याबाबतची कल्पना राष्ट्रीय शेअर बाजारालाही दिली आहे. रशियातील सरकारी कंपन्यांच्या सहकार्याने भारतीय नौदलासाठीही ही संरक्षण जहाजे तयार करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. २००३ ते २०१३ दरम्यान नौदलाच्या ताफ्यात असलेल्या तलवार जातीच्या जहाजांची ही नवी आवृत्ती असेल. रिलायन्स मालकी मिळवीत असलेल्या पिपावावमार्फत या जहाजांची बांधणी होईल.

Story img Loader