देशभरातील उद्योजकांची आघाडीची संघटना असलेल्या ‘भारतीय औद्योगिक महासंघा’च्या (सीआयआय) अध्यक्षपदी एस. गोपालकृष्णन यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी अजय श्रीराम व सुमित मजुमदार यांची निवड झाली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठी ही निवड असेल. गोपालकृष्णन हे इन्फोसिसचे सह संस्थापक व कार्यकारी सह अध्यक्ष आहेत. गोदरेज समूहाचे अदि गोदरेज यांच्याकडून ते उद्योग संघटनेचे प्रमुखपद स्वीकारणार आहेत. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक नवी दिल्लीत नुकतीच झाली. या व्यासपीठावरून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही उद्योजकांना संबोधित केले होते. उद्योग क्षेत्रात क्रिश म्हणून ओळखले जाणारे गोपालकृष्णन हे ‘इन्फोसिस’च्या १९८१ मधील स्थापनेतील नारायणमूर्ती यांचे एक सहकारी होते. उपाध्यक्ष श्रीराम हे डीसीएम श्रीराम कन्सोलिडेटेड लिमिटेडचे अध्यक्ष तर मजुमदार हे ट्रॅक्टर्स इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
एस. गोपालकृष्णन ‘सीआयआय’चे अध्यक्ष
देशभरातील उद्योजकांची आघाडीची संघटना असलेल्या ‘भारतीय औद्योगिक महासंघा’च्या (सीआयआय) अध्यक्षपदी एस. गोपालकृष्णन यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी अजय श्रीराम व सुमित मजुमदार यांची निवड झाली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठी ही निवड असेल.
First published on: 06-04-2013 at 01:26 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: S gopalakrishnan is the new cii president