मास्टर ब्लास्टर म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटमधील कर्तृत्वाचा गौरव करण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हांशी सारे जग  परिचित आहे. सोमवारी अक्षय्यतृतीयेचे औचित्य साधून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रथितयश समूह व्हॅल्यूमार्टने सराफ व्यवसायातील पदार्पण सचिनची छबी असलेल्या सुवर्णमुद्रांद्वारे केले. ‘व्हॅल्यूमार्ट गोल्ड अ‍ॅण्ड ज्वेल्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक सी. के. वासुदेवन यांनी या धाटणीची पहिली सुवर्णमुद्रा खुद्द सचिनलाच हॉटेल ट्रायडन्टमध्ये झालेल्या समारंभात अर्पण केली. प्रत्येकी १० ग्रॅम वजनाच्या प्रमाणित ९९९.९ टक्के (२४ कॅरेट) शुद्धतेची सचिन तेंडुलकर सुवर्णनाणी व्हॅल्यूमार्टगोल्ड.कॉम या ऑनलाइन दालनावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.                        (छाया : गणेश शिर्सेकर)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा