कोकणातील सहकार क्षेत्रामध्ये गेली सुमारे तेवीस वर्षे पारदर्शी कारभार करीत स्पृहणीय कामगिरी केलेल्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला राज्य शासनातर्फे ‘सहकार भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्यातील २८ हजार पतसंस्था, सहकारी संस्थांमधून विशिष्ट निकषांवर निवडक संस्थांची सखोल तपासणी तज्ज्ञ समितीकडून करण्यात आली. ठेवी गोळा करण्याबरोबरच कर्जदार-ग्राहकांना अद्ययावत सेवा-सुविधा, कर्जवसुली, पारदर्शी कारभार इत्यादी बाबी विचारात घेऊन या संस्थांना गुण देण्यात आले. त्यामध्ये कोकण विभागात आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थांनी अव्वल गुण मिळवले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा