सॅमसंग या क्रमांक एकच्या मोबाइल हॅण्डसेट कंपनीने तिच्या लोकप्रिय गॅलेक्झी गिअरच्या किमती सहा महिन्यांत दुसऱ्यांदा कमी केल्या आहेत. दक्षिण कोरियन कंपनीच्या या उपकरणाची किंमत आता भारतात १५,२९० रुपयांवर येऊन ठेपली आहे. मोबाइलशी जोडले जाणारे मनगटी घडय़ाळ म्हणून गॅलेक्झी गिअर सप्टेंबर २०१३ मध्ये २२,९९० रुपयांवरून १९,०७५ रुपयांवर आणून ठेवल्या होत्या. त्या आता आणखी कमी करत १५,२९० रुपये झाल्या आहेत. सुरुवातीला सॅमसंगच्या निवडक मोबाइलशी जुळणारे हे घडय़ाळ आता गॅलेक्झी श्रेणीतील जवळपास सर्व मोबाइलशी सांगड घालणारे ठरले आहे. एस३, एस४, एस४ मिनी, नोट२, नोट३ व ग्रॅण्ड२ मोबाइलवरील ईमेल आदी सुविधा या घडय़ाळावर पाहण्याची सुविधा आहे. अॅण्ड्रॉईड ४.३ तंत्रज्ञान व्यासपीठावरील या घडय़ाळाचा आकार १.६ इंची आहे. ५१२ एमबी रॅम व ४ जीबी अंतर्गत साठा असणाऱ्या या घडय़ाळात १.९ मेगा पिक्सलचा कॅमेराही आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा