नफेखोरीसाठी झालेल्या विक्रीतून बांधकाम, वाहन क्षेत्रातील समभाग तर चिंतेमुळे टाटा मोटर्स, एचडीआयएलसारख्या समभागांच्या आपटीने ‘सेन्सेक्स’ने गुरुवारी शतकी घसरण नोंदवत २० हजाराच्या खालचा स्तर गाठला. १०३.८४ अंश घसरणीमुळे तो १९,९२३.७८ वर स्थिरावताना आठवडय़ाच्या नीचांकावर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ३४.९५ अंश घसरणीसह पुन्हा ६ हजारापर्यंत, ६,०१९.३५ पोहोचला. सकाळच्या सत्रात ‘सेन्सेक्स’ २० हजारावरच प्रवास करत होता. मात्र ब्रिटिश ब्रॅण्ड जग्वार अ‍ॅण्ड लॅण्ड रोव्हरच्या संभाव्य नफ्यातील घसरणीच्या चिंतेने टाटा मोटर्सचे समभाग मूल्य ६% घसरले.

Story img Loader