१९,३०० च्या पुढे असणारा आणि कालच्या सत्रात काहीसा घसरलेला मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक मंगळवारी ४३ अंशांनी पुन्हा वधारला.
आशियाई बाजारात नरमाईचे वातावरण असूनही ‘सेन्सेक्स’ १९,३५० नजीक पोहोचला आहे.
कालच्या किरकोळ घसरणीनंतर आजच्या सत्रात जवळपास शतकी घसरण नोंदविणारा मुंबई निर्देशांक १९,२७५ वर आला होता.
दिवसअखेर मात्र तो जवळपास अर्धशतकी वाढीसह बंद झाला. राष्टीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ही १८.३० अंश वाढीसह ५,८८९.२५ वर गेला.
रिलायन्स, टाटा पॉवर, भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक यांच्या खरेदीच्या जोरावर बाजाराने आज वाढ नोंदविली. ‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी ११ समभाग वधारले होते. तर टीसीएस, महिंद्र अॅण्ड महिंद्र, आयटीसी यासारखे समभाग घसरणीसह बंद झाले. हिस्साविक्रीच्या चर्चेने जेट एअरवेज ५ टक्क्यांनी उंचावला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘सेन्सेक्स’ वधारला
१९,३०० च्या पुढे असणारा आणि कालच्या सत्रात काहीसा घसरलेला मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक मंगळवारी ४३ अंशांनी पुन्हा वधारला. आशियाई बाजारात नरमाईचे वातावरण असूनही ‘सेन्सेक्स’ १९,३५० नजीक पोहोचला आहे.
First published on: 05-12-2012 at 05:02 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sansex improved