राज्यातील सेवा कराशी निगडित होणारे माहिती तंत्रज्ञान व्यासपीठावरील व्यवहार सुरक्षित राहण्याच्या दृष्टिने राज्य शासनाच्या सेवा कर विभागाला सॅस या आयटी कंपनीचे जाळे उपलब्ध झाले आहे. नव्या माहिती तंत्रज्ञान सहकार्य भागीदारीमुळे सेवा कर विषयक माहिती साठा करणे सुलभ होणार आहे. सेवा कराचे नुकसान टाळण्यात यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
शासनाला मिळणाऱ्या कर महसुलापैकी सेवा कराचा हिस्सा एक तृतियांश आहे. विभागाच्या ११ हजाराहून अधिक मनुष्यबळाद्वारे राज्यातील सेवा कर, मूल्यवर्धित कर, व्यावसायिक कर आदींची हाताळणी होते. १९७६ ची स्थापना असलेल्या सॅसमार्फतोतापर्यंत ६५ हजारांहून अधिकांना कर क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञानविषयक सेवा देण्यात येत आहे.
सॅसच्या सहकार्यामुळे सेवा कर महसुल गळती रोखण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य शासनाच्या सेवा कर पोलिस (दक्षता) विभागाचे विशेष महा निरिक्षक विनय कारगावकर यांनी व्यक्त केला आहे. तर सॅस इन्स्टिटय़ुटचे (इंडिया) मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सुदिप्ता सेन यांनी म्हटले आहे की, भारत तसेच अनेक विदेशांतील सरकारी भागीदारीद्वारे कंपनी या क्षेत्रातील सेवा अधिक बळकट करत आहे.

Story img Loader