प्रश्न: दहा लाख रुपयांहून कमी वार्षकि उत्पन्न असलेली व्यक्ती राजीव गांधी इक्विटी योजनेचे फॅएरर खाते उघडू शकते हे कळले. पण मग डिमॅट खाते उघडताना हा दहा लाखाचा आकडा कोण पडताळून पहाणार? डीपी की इतर कुणी? त्यासाठी काय काय कागदपत्रे सादर करावी लागतील? की गुंतवणुकदाराने स्वतच्या जबाबदारीवर असे खाते उघडायचे?
– ही सर्व जबाबदारी गुंतवणूकदाराची असेल. फॉर्म ‘ए’ भरून द्यायचा असतो असे मागील लेखात लिहिले आहे, त्यात हे सर्व लिहून द्यायचे असते. जर दिलेली माहिती चुकीची किंवा विपर्यस्त आहे असे आढळून आल्यास मिळालेली करसवलत बाद करण्यात येईल.
प्रश्न: एकदा हे खाते उघडले की जरी माझे वार्षकि उत्पन्न जरी दहा लाख रुपयाहून कमी असले तरी त्या खात्यात मी समजा ४० लाख रुपये किंमतीचे शेअर्स खरेदी करून ठेवू शकतो? भले मग त्यासाठी मी कुठूनही कर्ज काढून ते शेअर्स घेईन.
– तुम्ही तसे करू शकता. पण एक बाब लक्षात ठेवा ती म्हणजे करसवलत फक्त ५०,००० रुपयांचीच गुंतवणूक आहे असे समजून दिली जाईल.
प्रश्न: राजीव गांधी इक्विटी योजनेत डिमॅट खात्यातील शेअर्सला ‘लॉक इन’ काळ किती असतो?
– पहिले एक वर्ष पूर्णपणे लॉक इन काळ असेल. नंतरची दोन वष्रे लवचिक (flexible) असेल. याचा अर्थ या दोन वर्षांच्या काळात जेवढे शेअर्स विकले असतील तितके त्या वर्षांत खरेदी करावे लागतील जेणेकरून ५०,००० रुपये गुंतवणूक हा आकडा कायम राहील. अर्थात ही जी काही भरपाई तुम्ही करणार ते शेअर्स या योजनेत सांगितल्यापकीच असले पाहिजेत हे उघड आहे. आणखी एक बाब महत्वाची की जरी तुम्हाला विकायला व परत खरेदी करायला परवानगी असेल तरीही प्रत्येक वर्षांतील किमान २७० दिवस ५०,००० रुपये इतकी गुंतवणूक कायम राहिली पाहिजे.
प्रश्न: ज्या वर्षी गुंतवणूक केली असेल त्या वर्षांसाठी कर वजावाट मिळण्यासाठे कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील?
– त्या वर्षीच्या ३१ मार्चनंतर सीडीएसएल ही डिपॉझिटरी संबंधित गुंतवणूकदारच्या डीपीला एक विवक्षित रिपोर्ट (ज्यात गुंतवणूकीचा आवश्यक तो तपशील असेल) देईल जो डीपी गुंतवणूकदाराला देणार. अर्थात या व्यतिरित्त अन्य काही कागदपत्रे आयकर विभागाने मागितली तर ती देणे ही गुंतवणूकदाराची जबाबदारी असेल.
प्रश्न: आनंद, अविनाश आणि अजित अशा संयुक्त नावाने आधीच एक डिमॅट खाते आहे जे राजीव गांधी इक्विटी योजना येण्याचे आधीच उघडले आहे. या खात्यात पहिले नाव आनंदचे आहे. अशा परिस्थितीत दुसरा आणि तिसरा व्यत्ती म्हणजेच अविनाश आणि अजित स्वतच्या म्हणजेच पहिले नाव घालून वेगळे फॅएरर खाते उघडू शकतात का?
– होय असे करता येते. म्हणजे उदाहरणार्थ अविनाश स्वतच्या नावाने सिंगल खाते उघडू शकेल किंवा अविनाश, अनिता, अरुन असे तिघांचे संयुत्त खाते उघडू शकेल
प्रश्न: अज्ञान (Minor) च्या नावाने फॅएरर खाते उघडता येते का? समजा ट्रल्ल१ चे स्वतचे उत्पन्न असे काहीच नसले तरी?
– होय, अज्ञान व्यत्तीच्या नावे असे खाते उघडता येते. त्यासाठी त्याने पसे कुठून आणले वगरे विषय डीपीच्या किंवा डिपॉझटरीच्या कक्षेत येत नाहीत. सर्वसाधारण डिमॅट खात्याच्या बाबतीत जो नियम आहे तो इथेही लागू आहे तो म्हणजे खाते उघडणे व संबंधित कागदपत्रावर सह्या करणे हे काम त्याचा पालक (Guardian) करणार कारण अज्ञान व्यत्ति सह्या करू शकत नाही.
प्रश्न: कोणत्या आयपीओ मध्ये अर्ज करता येईल याचे निकष सेबी परिपत्रकात दिले आहेत. सामान्य गुंतवणुकदाराला ही सर्व माहिती कुठे उपलब्ध होईल? स्टॉक एक्सचेंज ही माहिती देणार आहे का?
– ही माहिती गोळा करणे हे थोडे किचकट काम वाटण्याची शक्यता आहे. पण स्टॉक एक्सचेंजमार्फत ही माहिती उपलब्ध करून दिली जाईल.
प्रश्न: लॉक इन काळ तीन वष्रे आहे असे म्हणतात तर कुणी म्हणतो एक वर्ष. वस्तुस्थिती काय आहे?
– वर याचे उत्तर दिले आहे. पहिले एक वर्ष सत्तीचे लॉक इन व नतरची दोन वष्रे लवचिक लॉक इन. सेबी परिपत्रकात याची माहिती दिली आहे ती अधिकृत समजावी. कुणी काय सांगतो हे तितके महत्वाचे नाही कारण रामदास स्वामीनी सांगून ठेवले आहे की ‘जो तो बुद्धीच सांगतो!’ ज्याप्रमाणे काही लोक सांगतात की एक व्यक्ती केवळ एकच डिमॅट खाते (सर्वसाधारण डिमॅट..RGESS नाही) उघडू शकते. पण ही माहिती चुकीची आहे. एक व्यत्ती कितीही डिमॅट खाती उघडू शकते. सेबीचा तसा नियमच आहे. बाकी कुणीही काहीही सांगो.
प्रश्न: गुंतवणूक करायची ती एका आर्थिक वर्षांत की खाते उघडल्यानंतर एक वर्षांत? समजा फेब्रुवारी २०१३ मध्ये खाते उघडले आणि २३ फेब्रुवारीला तीस हजार रुपयांचे शेअर्स खरेदी केले. जून २०१३ मध्ये परत आणखी वीस हजार रुपयांचे शेअर्स खरेदी केले. मग दोन वेगवेगळय़ा आíथक वर्षांचे रिटर्न भरताना ३० आणि २० हजार रुपयांची गुंतवणूक कर वजावटीसाठी पात्र आहे का?
– फक्त ३० हजार रुपयांची गुंतवणूकच करसवलतीसाठी विचारात घेतली जाईल. स्पष्टच सांगायचे तर डिमॅट खाते उघडल्यानंतर जेव्हा केव्हा गुंतवणूक कराल त्यानंतरच्या येणाऱ्या ३१ मार्चपर्यंतचीच गुंतवणूक विचारात घेतली जाते.
प्रश्न: मी फेब्रुवारी २०१३ मध्ये डिमॅट खाते उघडले व पहिली गुंतवणूक जानेवारी २०१५ मध्ये केली, असे चालते का? कारण मधल्या काळात खाते रिकामेच होते.
– असे चालू शकते.
प्रश्न: मी ५० हजार रुपये किंमतीचे शेअर्स खरेदी केले. ब्रोकरने दिलेल्या काँट्रक्ट नोटमध्ये शेअर्सची किंमत, ब्रोकरेज, विविध टॅक्स इत्यादि मिळून ५० हजार रक्कम होते आहे. समजा ब्रोकरेज, टॅक्सची रक्कम एक हजार होत असेल तर माझी गुंतवणूक ४९ हजार रुपये आहे असे समजून आणखी एक हजार रुपयांचे शेअर्स मी घेऊ शकतो का ?
– होय. ब्रोकरेज, सर्व्हिस टॅक्स वगरेची रक्कम गुंतवणूकीत धरली जात नाही.
प्रश्न: नवरत्न, बीएसई १०० वगरे बरोबरच इतर काही शेअर्स मी घेऊन या खात्यात ठेवू शकतो का?
– ठेऊ शकता पण करसवलतीसाठी ते विचारात घेतले जाणार नाहीत
प्रश्न: एक व्यक्ती फक्त एकच राजीव गांधी इक्विटी योजनेत खाते उघडू शकते असे वाचले. पण एखादी व्यक्ती परत दुसरे खाते उघडायला दुसऱ्या डीपीकडे गेली तर त्या दुसऱ्या डीपीला ते कसे कळणार? की ती जबाबदारी गुंतवणूकदारावरच टाकली आहे?
– पहिले राजीव गांधी इक्विटी योजनेत डिमॅट खाते सीडीएसएलमध्ये असेल तर दुसरे खाते उघडण्याच्या प्रक्रियेदरम्यान ही बाब ‘सीडीएसएल’ला कळते त्यामुळे दुसरे खाते उघडण्यावर तिथेच प्रतिबंध आणला जातो. मात्र दुसरे खाते एनएसडीएलमध्ये उघडण्याचा प्रयत्न झाला तर ती बाब दुसऱ्या दिवशी डिपॉझिटरीला कळते. या योजनेच्या अंतर्गत दिली जाणारी सर्व माहिती एकत्रितपणे संकलित करून सर्वाना त्याच्या उपयोग व्हावा या हेतूने वाचकानी आपले प्रश्न rgess@cdslindia.com इथे ईमेलद्वारे पाठवावेत.
श.. शेअर बाजाराचा – आरजीईएसएस ; करबचत व उमदी गुंतवणूकही!
दहा लाख रुपयांहून कमी वार्षकि उत्पन्न असलेली व्यक्ती राजीव गांधी इक्विटी योजनेचे फॅएरर खाते उघडू शकते हे कळले. पण मग डिमॅट खाते उघडताना हा दहा लाखाचा आकडा कोण पडताळून पहाणार? डीपी की इतर कुणी? त्यासाठी काय काय कागदपत्रे सादर करावी लागतील? की गुंतवणुकदाराने स्वतच्या जबाबदारीवर असे खाते उघडायचे?
First published on: 28-12-2012 at 02:18 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Save income tax with profitable investments