बँकिंग अग्रणी आणि गृहवित्त क्षेत्रातील आघाडीच्या भारतीय स्टेट बँकेने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घोषित केलेल्या विशेष दरातील गृहकर्ज योजनेला ३१ मार्च २०१४ च्या पुढे अनिश्चित काळासाठी मुदतवाढ दिली आहे.
या योजनेनुसार गृहकर्जासाठी नव्याने अर्ज करणाऱ्या ग्राहकांना विद्यमान दराच्या तुलनेत ०.४ टक्के सवलत, तर महिला ग्राहकांना आणखी ०.५ टक्क्यांची सवलत दिली गेली होती. तथापि या मर्यादित कालावधीसाठी असलेल्या योजनेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता, तिला पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे, असे बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. या योजनेत ७५ लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज नवीन ग्राहकांना १०.१५ टक्के व्याजदराने तर महिला ग्राहकांना १०.१० टक्के व्याजदराने उपलब्ध केले गेले आहे, तर ७५ लाखांपेक्षा अधिक रकमेचे गृहकर्ज नवीन ग्राहकांना १०.३० टक्के दराने, तर महिला ग्राहकांना १०.२५ टक्के दराने वितरित केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा