खातेदारांचा काळा पैसा अन्य योजनांमध्ये गुंतवून त्याचे वैध स्त्रोतामध्ये रुपांतर करण्यात तीन खासगी बँकांनी पुढाकार घेतल्याचे ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे समोर आणणाऱ्या ‘कोब्रापोस्ट’ या संकेतस्थळाने पुन्हा भारतीय अर्थव्यवस्थेतील गैरप्रकार उघडकीस आणल्याचा दावा केला आहे.
संकेतस्थळाने स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसिज बँक, आयडीबीआय बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, देना बँक, कॉर्पोरेशन बँक, अलाहाबाद बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया (सर्व राष्ट्रीयकृत बँका); येस बँक, धनलक्ष्मी बँक, फेडरल बँक, डीसीबी (खासगी बँक), रिलायन्स लाईफ, टाटा एआयए, बिर्ला सन लाईफ (खासगी विमा कंपन्या) व एलआयसी (राष्ट्रीयकृत विमा कंपनी) यांनी केवायसी न करता बनावट पॅनद्वारे व्यवहार केल्याचे म्हटले आहे.
े इर्डाकडून चौकशी सुरू
भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने (इर्डा) शहानिशा सुरू केली असून दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आयुर्विमा महामंडळाने सर्व नियम अंमलात आणत असल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक खासगी-राष्ट्रीयकृत बँक, विमा कंपन्यांनी आरोपाचा इन्कार केला आहे. बँकांच्या बाबत ‘आयबीए’ला निर्देश देण्यात आले आहेत.

Story img Loader