भांडवल पर्याप्ततेपोटी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका बाजारातून १६,००० कोटी रुपये उभारण्याची शक्यता आहे. यानुसार, सर्वाधिक १५,००० कोटी रुपये स्टेट बँक तर उर्वरित १,००० कोटी रुपये याच क्षेत्रातील ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स बाजारातून जमा करेल. चालू आर्थिक वर्षांत कॅनरा बँकही १,५०० कोटी रुपये उभारण्याची शक्यता आहे.
भांडवली बाजारातील विविध पर्यायांमार्फत बँकांच्या निधी उभारणीनंतर या बँकांतील सरकारचा हिस्सा ५२ टक्क्यांपर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होण्याबाबतचे भाष्य अर्थ राज्यमंत्र्यांनी मंगळवारी संसदेत केले.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सरकारी हिस्सा ५२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी बँकांना १.६० समभाग बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावे लागतील. देशातील २७ सार्वजनिक बँकांपैकी २२ बँकांमध्ये सरकारचा सर्वाधिक हिस्सा आहे, तर उर्वरित पाच सार्वजनिक बँकांमध्ये स्टेट बँकेच्या माध्यमातून सरकारचा हिस्सा आहे.