देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या दुसऱया तिमाहीतील नफ्यामध्ये ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. ३० सप्टेंबर २०१३ रोजी संपलेल्या दुसऱया तिमाहीमध्ये स्टेट बॅंकेला ३,०७२.७७ कोटी रुपयांचा नफा झाला. गेल्या आर्थिक वर्षातील दुसऱया तिमाहीमध्ये बॅंकेला ४,५७५.३१ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
अनुत्पादक कर्जांचे प्रमाण वाढल्यामुळेच बॅंकेच्या नफ्यामध्ये घट झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षांमध्ये दुसऱया तिमाहीत बॅंकेकडे १,८३७.१९ कोटी रुपयांची अनुत्पादक कर्जे होती. त्यामध्ये चालू आर्थिक वर्षांत २,६४५.४० कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.