देशातील सर्वात मोठे कर्जवाटप असलेल्या भारतीय स्टेट बँकने वाढत्या अनुत्पादित कर्जाला आळा घालण्यासाठी कर्जदारांचे पतमापन हे वर्षांतून एकदा न होता वेळोवेळी व आवश्यकता भासेल तेव्हा करण्याचे ठरविले आहे. स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी बँकेच्या अर्धवार्षकि निकालानंतर हे स्पष्ट केले.
स्टेट बँकेने आपल्या कर्जदारांचे वर्गीकरण एसबी-१ ते एसबी-१५ अशा वेगवेगळ्या पतगटांत केले आहे. हे पतनिर्धारण वर्षांतून एकदा करण्याची स्टेट बँकेची पद्धत आहे.
याबाबत भट्टाचार्य म्हणाल्या की, वाढत्या अनुत्पादित कर्जाना आळा घालण्यासाठी हे पतनिर्धारण वर्षांतून एकदा करणे पुरेसे नाही. वर्षभरात आíथक व व्यवसाय करण्याच्या पद्धतीत बदल होत असतात. हे बदल जाणून पत कमी किंवा अधिक होणे गरजेचे असते. म्हणून पतनिर्धारण केवळ वर्षांतून एकदा न होता आवश्यकता भासेल तेव्हा करेल, असे त्या म्हणाल्या.
अनुत्पादित कर्जे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न; नियमित कर्जदारांचे पतमापन करणार : भट्टाचार्य
देशातील सर्वात मोठे कर्जवाटप असलेल्या भारतीय स्टेट बँकने वाढत्या अनुत्पादित कर्जाला आळा घालण्यासाठी कर्जदारांचे पतमापन हे वर्षांतून एकदा न होता वेळोवेळी व आवश्यकता भासेल तेव्हा करण्याचे ठरविले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-11-2014 at 12:38 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi will try to stop unproductive loans in future says arundhati bhattacharya