मतदानोत्तर चाचण्यावरच तेजीचे धक्के देणारा भांडवली बाजार लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर कसा प्रतिसाद देतो, यासाठीची देखरेख यंत्रणा सज्ज असल्याचा दावा सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी गुरुवारी केला. ‘असोचेम’च्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सिन्हा यांना याबाबत विचारले असता त्यांनी, भांडवली बाजारात शुक्रवारी होणाऱ्या कोणत्याही हालचाली, धक्क्यांचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले. रिझव्‍‌र्ह बँक व सरकारच्या सहकार्याने सेबीची यासाठीची यंत्रणा सज्ज असल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा