भांडवली बाजारातील घसरण सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली. परिणामी ५०.७० अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,६५९.२० वर आला, तर १२.१० अंश घसरणीमुळे निफ्टी ८,६९९.९५ पर्यंत स्थिरावला. निफ्टीने त्याचा ८,७०० चा स्तर बुधवारी सोडला, तर सेन्सेक्स आता महिन्यातील नव्या तळात विसावला आहे.
अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या व्याजदर निर्णयावर गेल्या तीन व्यवहारांपासून घसरणीचा प्रवास नोंदविणारा भांडवली बाजार ११ फेब्रुवारीनंतरच्या किमान स्तरावर आला आहे. सेन्सेक्समधील या दरम्यानची घसरण ७८९.७८ अंश राहिली आहे. बाजारात पोलाद, तेल व वायू, आरोग्य निगा, भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान समभागांना उतरंड लाभली.
निर्देशांकांची सलग तिसरी गटांगळी
भांडवली बाजारातील घसरण सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली. परिणामी ५०.७० अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,६५९.२० वर आला
First published on: 12-03-2015 at 07:09 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selling pressure resumes nifty breaks below 8700 top 20 intraday bets