आजारी बँकांतील वृद्ध ठेवीदारांचे रिझव्‍‌र्ह बँकेला साकडे
रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशानुसार रुपी सहकारी बँकेचे आर्थिक व्यवहार २२ फेब्रुवारी २०१३ पासून आजतागायत ठप्प आहेत. बँकेवर प्रशासक नेमले असले तरी ते प्रत्येक गोष्टीसाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशाकडे बोट दाखवितात. विम्याचे संरक्षण आहे म्हणून बँकेत ठेवलेल्या एक लाखाच्या ठेवी तरी काढण्याची मुभा मिळावी अशी आस लावून बसलेले ज्येष्ठ नागरिकांनी आता निवाडय़ासाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांनाच साकडे घातले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज मी ८२ वर्षांचा आहे. या पैशांची मला गरज आहे. मात्र मुदत उलटून गेलेल्या आणि विम्याचे संरक्षण असतानाही माझे एक लाख रुपये मला दिले जात नाहीत, याचे किमान उत्तर तरी मला मिळेल का, असा अस्वस्थ करणारा सवाल रिझव्हॅ बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना पत्र लिहून कमलाकर करंदीकर यांनी विचारला आहे. शेकडो ज्येष्ठ नागरिकांचा हाच सवाल असून वृद्धावस्थेतील या मंडळींना रिझव्‍‌र्ह बँकेकडून काही दिलासा मिळेल हा त्यांचा प्रश्न आहे.

थोडासा चांगला व्यजदर मिळतो म्हणून शेकडो वृद्ध मंडळी सेवानिवृत्ती पश्चात मिळालेला लाभ सहकारी बँकांच्या मुदत ठेवीत गुंतवितात. यातील अनेक बँकांना आजार जडल्याने आज हजारो लोकांचे पैसे अडकून पडले आहेत. अनेकांना बचत खात्यातील मोजकेच पैसे तेही वर्षांतून एक-दोनवेळा काढता येतात. रुपी बँक अद्यापि अवसायानात निघाली नसली तरी रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशामुळे बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. ठेवीदारांना बचतखात्यातील अवघे हजार रुपये काढण्याची वर्षांतून एकदाच परवानगी मिळाली आहे.

गंभीर बाब म्हणजे मुदत ठेवीत एक लाख रुपयांपर्यंत ठेवलेल्या रकमेला विमा संरक्षण असते. अशा रकमाही बँकेकडून ठेवीदारांना दिल्या जात नाहीत की त्या संदर्भात नेमके काय केले जाणार याची माहिती मिळत नाही. अशा ठेवी ठेवणारे बहुतेकजण माझ्यासारखे वृद्ध असून त्यांनी आता काय करायचे हा करंदीकर यांचा सवाल आहे. गव्हर्नर राजन यांना पत्र लिहून याबाबत विचारणा केल्यानंतरही अद्यापि कोणतेही उत्तर त्यांच्याकडून मिळत नसेल तर आमच्यासरख्या ज्येष्ठ नागरिकांनी करायचे काय, हा त्यांचा सवाल आहे.

यापुढे रघुराम राजन यांना रोज स्मरणपत्र पाठवून आम्ही वृद्ध लोक उत्तर मागू असेही करंदीकर यांनी सांगितले. रुपी बँकचे कॉसमॉस बँकेत विलिनीकरण केले जाईल असे एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस सांगतात तर दुसरीकडे रिझव्‍‌र्ह बँक एक लाखाच्या ठेवीबाबत साधी माहितीही देत नाही, हे अनाकलनीय असून आम्हाला ‘अच्छे दिन’ कधी दिसणार असा त्यांचा सवाल आहे.