भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांच्या विक्रीचे धोरण सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. सलग चौथ्या व्यवहारात नकारात्मक कामगिरी बजावताना मुंबई निर्देशांक २७,५०० च्याही खाली आला. प्रमुख बाजाराचा हा महिन्याचा तळ आहे. १०२.१५ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,४५९.२३ वर स्थिरावला. कंपन्यांच्या निराशाजनक वित्तीय निष्कर्षांवर, फेडरल रिझव्‍‌र्हच्या दोन दिवसांच्या बैठकीच्या फलिताची प्रतीक्षा करत गुंतवणूकदारांनी आठवडय़ातील सलग दुसऱ्या व्यवहारात विक्रीचे धोरण अवलंबिले. निफ्टीतही २४ अंश घसरण होत निर्देशांक ८,३३७ वर बंद झाला.
रुपया उंचावला : सलग चार व्यवहारांतील घसरणीनंतर रुपया मंगळवारी थेट २५ पैशांनी उंचावला. डॉलरच्या तुलनेत रुपया ६३.९१ पर्यंत वाढताना गेल्या दीड महिन्याच्या तळातून बाहेर आला. स्थानिक चलनाने सोमवारी १२ पैशांची घसरण नोंदविली होती. तर गेल्या सलग चार व्यवहारांत तो ६१ पैशांनी रोडावला आहे. मंगळवारचा त्याचा प्रवास ६४.१२ ते ६३.८९ असा वरचा राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा