गेला सप्ताहभर घसरता राहिलेल्या भांडवली बाजारांनी नव्या आठवडय़ाची सुरुवातही आपटीसह कायम राखली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी २६६.६७ अंश घसरणीने २४,१८८.३७ पर्यंत घसरला. तर निफ्टीत ८६.८० अंश आपटीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ७,३५१.०० वर येऊन ठेपला आहे.
सलग १३ व्या महिन्यातील, डिसेंबरमधील देशाची घसरती निर्यात आणि त्यामुळे विस्तारलेली व्यापार तूट तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल प्रति पिंप थेट २८ डॉलपर्यंत, त्याच्या २००३ मधील स्तरावर येऊन ठेपल्याची चिंता बाजारात सप्ताहारंभीच्या व्यवहारात उमटली.
सेन्सेक्समधील सोमवारची घसरण ही सलग तिसऱ्या सत्रातील राहिली. यामुळे मुंबई निर्देशांक आता २६ मे २०१४ च्या स्तरावर येऊन ठेपला आहे. केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या कालावधीतील हा हा स्तर होता. गेल्या तीन व्यवहारात मुंबई निर्देशांकाचे ६६५.७४ अंश नुकसान झाले आहे.
नव्या आठवडय़ाची सुरुवात २४,४०० या किमान स्तरावर करणारा सेन्सेक्स सोमवारच्या व्यवहारात २४,१४१.९९ पर्यंत घसरला. तर त्याचा सत्रातील वरचा टप्पा २४,५२४.८५ पर्यंत गेल्यानंतरही दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत मोठी घसरण झाली. सेन्सेक्सची हा स्तर १६ मे २०१४ नंतरचा किमान स्तर आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सोमवारी ७,४०० चाही स्तर सोडला. जवळपास शतकी अंश घसरणीसह देशातील सर्वात मोठय़ा बाजाराचा प्रमुख निर्देशांक आता २ जून २०१४ च्या समकक्ष आला आहे. घसरत्या खनिज तेल दरामुळे सेन्सेक्समधील रिलायन्सला अधिक मूल्य घसरण फटका बसला. कंपनी समभागाला सोमवारी ५.१४ टक्के कमी भाव मिळाला. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य एकाच सत्रात १७,७७९ कोटी रुपयांनी रोडावले.
रिलायन्स इंडस्ट्रिज चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष मंगळवारी जाहीर करत आहे. तर पाठोपाठ बजाज ऑटोचा समभाग ३.६७ टक्क्य़ांनी घसरला. नफ्यातील अवघी २ टक्के वाढ नोंदविणाऱ्या विप्रोचे समभाग मूल्य मात्र एकूण निर्देशांक घसरणीतही उंचावले. सेन्सेक्समधील १९ कंपनी समभागांचे मूल्य रोडावले. यामध्ये एशियन पेंट्स, सिप्ला, ओएनजीसी, कोल इंडिया, लार्सन अॅन्ड टुब्रो, डॉ. रेड्डीज, स्टेट बँक आदी घसरले होते.
सेन्सेक्स २० महिन्यांच्या खोलात; मुंबई निर्देशांकाची २६७ अंश आपटी
गेला सप्ताहभर घसरता राहिलेल्या भांडवली बाजारांनी नव्या आठवडय़ाची सुरुवातही आपटीसह कायम राखली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी २६६.६७ अंश घसरणीने २४,१८८.३७ पर्यंत घसरला. तर निफ्टीत ८६.८० अंश आपटीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ७,३५१.०० वर येऊन ठेपला आहे. सलग १३ व्या महिन्यातील, डिसेंबरमधील देशाची घसरती निर्यात आणि त्यामुळे विस्तारलेली व्यापार तूट तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज […]
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-01-2016 at 07:47 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex and nifty