सलग दुसऱ्या दिवशीच्या सत्रात २८ हजारापल्याड पोहोचणाऱ्या सेन्सेक्सला दिवसअखेर मात्र या टप्प्यावर राहण्यात अपयश आले. मात्र सोमवारप्रमाणे मुंबई निर्देशांकाने आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात तेजीही नोंदविली नाही.
२८.२९ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,९३२.९० वर आला. तर सत्रात ८,४८०.२५ पर्यंत जाणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर अवघ्या ५.५५ टक्क्यांनी खाली येत ८,४५४.१० वर स्थिरावला.
जूनमधील वाढत्या किरकोळ महागाई दराने रिझव्र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या आशा उंचावल्याने भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी मंगळवारी नफेखोरी अवलंबिली. दरम्यान, गेल्या महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकातील सलग आठवा शून्याखालील प्रवासही मंगळवारीच स्पष्ट झाला.
व्यवहाराची सुरुवात करतानाच सेन्सेक्सने मंगळवारी तेजीसह २८ हजारांचा पल्ला गाठला. सत्रात तो २८,०१८.५९ पर्यंत उंचावला. व्यवहारातील त्याचा तळ हा दिवसअखेरचा बंदच राहिला. गेल्या सलग दोन व्यवहारांत मुंबई निर्देशांकाने ३८७.५३ अंश भर नोंदविली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति पिंप थेट ५७ डॉलपर्यंत घसल्याने बाजारातील सूचिबद्ध तेल व वायू क्षेत्रातील कंपन्यांचे समभागही ३ टक्क्यांपर्यंत वाढले. सेन्सेक्सच्या घसरणीचा सर्वाधिक फटका टाटा मोटर्सला ४.१० टक्के घसरणीसह बसला.
सेन्सेक्स-निफ्टीला नफावसुलीचे ग्रहण!
सलग दुसऱ्या दिवशीच्या सत्रात २८ हजारापल्याड पोहोचणाऱ्या सेन्सेक्सला दिवसअखेर मात्र या टप्प्यावर राहण्यात अपयश आले.
First published on: 15-07-2015 at 07:19 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex and nifty fall down after profit booking