फेब्रुवारी महिन्यातील सौदापूर्ती दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना, भांडवली बाजारात खरेदीचा जोर कायम असून त्या परिणामी मुख्य निर्देशांक- सेन्सेक्स मंगळवारअखेर २०,८५२.४७ असा महिन्यांतील उच्चांकावर स्थिरावला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो (२.९५%) आणि बजाज ऑटो (२.१४%) असे दिवसातील व्यवहाराचे सेन्सेक्समधील तेजीचे सर्वात मोठे लाभार्थी ठरले. इन्फोसिसही ३,७८२ रु. असा त्याच्या सार्वकालिक उच्चांकाच्या समीप आणखी सरकताना दिसला. गुरुवारी फ्युचर्स आणि ऑप्शन्स व्यवहाराच्या फेब्रुवारी मालिकेचा सौदापूर्तीचा दिवसाचे सावट म्हणून बाजारातील व्यवहारही वादळी वध-घट दाखविणारे अनिश्चिततेचे बनण्याचे कयास वश्लेषक व्यक्त करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा