महिन्यातील पहिल्या व्यवहारासह नव्या आठवडय़ाची निरुत्साह सुरुवात करणारा मुंबई शेअर बाजार सप्ताह नीचांकावर येऊन ठेपला. तर सोमवारी निफ्टीनेही ८,८०० च्या खालचा प्रवास मंगळवारी नोंदविला.
मुंबई निर्देशांक सलग दुसऱ्या सत्रात घसरला आहे. सेन्सेक्समध्ये ६०.६८ अंश घसरण होऊन मुंबई निर्देशांक २९,१२२.२७ वर बंद झाला. ११.५० अंश घसरणीसह निफ्टीने सोमवारी ८,८००च्या खाली, ८,७९७.४० पर्यंत निराशाजनक कामगिरी केली.
रिझव्र्ह बँकेच्या मंगळवारच्या पतधोरणाकडे डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी भांडवली बाजारातील व्यवहारात मोठा सहभाग नोंदविला नाही. पतधोरणापूर्वी अचानक पाव टक्क्य़ांची दर कपात करणाऱ्या मध्यवर्ती बँकेकडून पुन्हा हाच कित्ता गिरविण्याची बाजाराला आशा आहे.
त्यामुळेच बाजारात नफेखोरीचाही दबाव तसा दिसला नाही. व्यवहारात सेन्सेक्सने २९ हजाराच्या खालचाही प्रवास अनुभवला. तर त्याची सत्रातील मजल २९,२६८.१३ पर्यंत गेली.
सेन्सेक्समधील १७ समभागांचे मूल्य घसरले. तर १३ समभागांना मागणी राहिली. यामध्ये अॅक्सिस बँक, हिंदाल्को, विप्रो, लार्सन अॅन्ड टुब्रो, गेल, सन फार्मा, टीसीएस, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, भेल हे तेजीत राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तेल व वायू, पोलाद, आरोग्यनिगा निर्देशांक घसरणीच्या यादीत राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सोमवारचा घसरणीचा प्रवास हा २२ जानेवारीनंतरच्या किमात स्तरावरचा आहे. यावेळी बाजार २९ हजाराच्या काठावर, २९,००६.०२ वर बंद झाला होता. तर सलग दोन व्यवहारातील सेन्सेक्सची घसरण ही ५०० हून अधिक, ५५९.५० अंशांची राहिली आहे.
भांडवली बाजारातील सोमवारचा प्रवास हा प्रामुख्याने रिझव्र्ह बँकेच्या मंगळवारच्या पतधोरणाच्या प्रतीक्षेत झाला आहे. त्यामुळेच व्याजदराशी संबंधित समभाग, निर्देशांकांमध्येही एक प्रकारचा दबाव दिसून आला.
किरण कुमार कविकोंडला, संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, वेल्थरेज सिक्युरिटीज.

Story img Loader